दिल्ली-मुंबई आता बारा तासांत,एक लाख कोटी रुपयांचा एक्स्प्रेस वे

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना ऑनलाईन, मुंबई

देशाच्या अविकसित व दुर्गम भागाचा विकास करण्यासाठी नवी दिल्ली ते मुंबई हा महत्त्वाकांक्षी एक्स्प्रेस वे बांधण्यात येणार आहे. सुमारे एक लाख कोटी रुपये रुपये खर्च करून हा एक्स्प्रेस वे बांधण्यात येईल. येत्या १५ दिवसांत या प्रकल्पाचे बांधकाम सुरू होईल. या एक्स्प्रेस वेमार्गे मुंबई ते दिल्ली हे अंतर केवळ बारा तासांत कापता येईल, अशी माहिती केंद्रीय भुपृष्ठ वाहतूकमंत्री नितीन गडकरी यांनी आज पत्रकार परिषदेत दिली.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सरकारला चार वर्षे पूर्ण झाल्याबद्दल नितीन गडकरी यांनी देशात सुरू असलेल्या प्रकल्पांची माहिती दिली. नव्याने तयार होणाऱया दिल्ली ते मुंबई या एक्स्प्रेस वेची माहिती देताना ते म्हणाले की, दिल्ली, जयपूर, गुडगाव, अलवर, सवाई माधोपूर, बडोदरा-मुंबई असा हा एक्स्प्रेस वे बांधण्यात येणार आहे. उत्तर हिंदुस्थान तसेच राजस्थान, गुजरातमधील अविकसित व मागासलेल्या भागातून हा मार्ग जाईल. या एक्स्प्रेस वेच्या आसपासच्या मागासलेल्या भागाचा मोठय़ा प्रमाणावर विकास होईल. त्यातील वडोदरा ते मुंबई या मार्गावरील ४४ हजार कोटी रुपयांच्या एक्स्प्रेस वेचे बांधकाम येत्या १५ दिवसांत सुरू होईल असे ते म्हणाले. या एक्स्प्रेस वेमुळे दिल्ली ते मुंबई हे अंतर १२५ किलोमीटरने कमी होईल. दिल्लीतून केवळ बारा तासांत मुंबईत गाठता येईल असे गडकरी म्हणाले.

बुलेट ट्रेनला विरोध चुकीचा

बुलेट ट्रेनला होणारा विरोध म्हणजे राजकीय अपरिक्वता आणि विकासविरोधी भूमिका असल्याचे मत त्यांनी व्यक्त केली. महाराष्ट्र राज्य प्रगतशील राज्य आहे. प्रकल्पांना विरोध योग्य नाही. या प्रकल्पामुळे एकाच राज्याला फायदा होईल असे विचार करणे अपरिपक्वतेचे लक्ष आहे. बुलेट ट्रेनला जपानकडून मिळणारा निधी अन्य प्रकल्पांसाठी वापरता येणार नाही असे ते म्हणाले.