महाराष्ट्र शाहीरची पहिली झलक..

शाहीर साबळे. मराठीचा स्वाभिमान ज्यांनी आयुष्यभर जपला. साने गुरुजींच्या राष्ट्र सेवादलाचे ठाशीव संस्कार घेऊन मराठी लोककला, लोकसंगीत आंतरराष्ट्रीय पातळीवर पोहोचवले. त्यांच्या स्मृतीदिनी त्यांचा नातू केदार शिंदे महाराष्ट्र शाहीर हा चित्रपट घेऊन येतो आहे. त्याचा पहिला टीझर रसिकांच्या भेटीला आला आहे.
अंकुश चौधरीशाहीर कृष्णराव साबळे यांच्या भूमिकेत आहेत. साने गुरुजी, आचार्य अत्रे, लता मंगेशकर अशी दिग्गज व्यक्तिमत्वे या चित्रपटांत दिसणार आहेत. पुढील महिन्याच्या म्हणजेच २८ एप्रिलला हा चित्रपट प्रदर्शित होत आहे.