नया है यह! पाण्यावर चालणारा स्पीकर ते घराची देखरेख करणारा रोबोट

जगातील सर्वात मोठा इलेक्टॉनिक शो (सीईएस 2021) सुरू झाला आहे. या शोमध्ये अनेक इनोवेटिव्ह प्रोडक्ट्स बघायला मिळत आहे. पाण्यावर चालणारा स्पीकरपासून घरावर देखरेख ठेवणारा रोबोट, उडती कार, स्मार्ट एन 95 मास्क आदी अनेक गोष्टींचा समावेश आहे. यातील काही उत्पादने मार्केटमध्ये विक्रीसाठी उपलब्ध आहेत तर काही लवकरच येतील.

मोबाईलकर नियंत्रण ठेवणारी अंगठी

शोमध्ये अशी एक अंगठी लाँच करण्यात आली आहे, ती बाईक चालवताना फोनचा ऍक्सेस घेऊ शकेल. अंगठीच्या एका बाजूला जॉयस्टिक लावण्यात आला आहे. तिच्या मदतीने कॉलला उत्तर देता येईल. तसेच गाणीदेखील बदलता येतील. अंगठी अँड्रॉईड- आयओएस कॅम्पेटिबल ऍपसोबत येईल.

टचेबल डोअर बेल

आपले घर विषाणूंपासून सुरक्षित रहावे, म्हणून एक खास डोअरबेल तयार करण्यात आली आहे. कुणी डोअरमेटवर उभे राहिले तर आपोआप बेल वाजेल आणि मोबाईलवर अलर्ट मिळेल. त्यापासून दारावरच्या बेलला हात लावण्याची वेळ येणार नाही.

ब्लू टूथ  शॉवर स्पीकर 

हे खास उपकरण असून ते विजेवर नव्हे तर पाण्याच्या शक्तीवर चालेल. आपण जर शॉवर सुरू केला तर त्या पाण्यातून स्पीकर सुरू होईल आणि गाणी वाजू लागतील. प्लॅस्टिकवर रिसायकलिंग करून स्पीकर्सचे भाग तयार करण्यात आले आहे.

आपली प्रतिक्रिया द्या