
विक्रम साराभाई स्पेस सेंटर (VSSC) चे संचालक आणि इस्रोचे प्रमुख शास्त्रज्ञ एस. सोमनाथ यांची हिंदुस्थानी अंतराळ संशोधन संस्थेचे (इस्रो) नवीन प्रमुख म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. तिरुअनंतपुरमस्थित व्हीएसएससीचे संचालक एस. सोमनाथ हे देशातील सर्वोत्तम रॉकेट तंत्रज्ञ आणि एरोस्पेस अभियंता आहेत.
व्हीएसएससीपूर्वी एस. सोमनाथ हे लिक्विड प्रोपल्शन सिस्टम्स सेंटर (LPSC) तिरुवनंतपुरमच्या संचालकपदी देखील ते राहिले आहेत. इस्रोच्या रॉकेट विकासात त्यांचे मोठे योगदान आहे. सोमनाथ लाँच व्हेईकल डिझाईन करण्यात मास्टर आहेत. लाँच व्हेईकल सिस्टीम इंजिनीअरिंग, स्ट्रक्चरल डिझाईन, स्ट्रक्चरल डायनॅमिक्स आणि पायरोटेक्निक्समध्ये ते तज्ञ आहेत.
सरो प्रमुख होण्यापूर्वी ते GSAT-MK11 (F09) अपग्रेड करण्याच्या कामात गुंतले होते. जेणेकरून अवजड दळणवळण उपग्रह अवकाशात सोडता येतील. याशिवाय एस. सोमनाथ हे GSAT-6A आणि PSLV-C41 मध्ये सुधारणा करण्याचे काम करत होते. जेणेकरून रिमोट सेन्सिंग उपग्रह योग्यरित्या प्रक्षेपित करता येतील.
एस. सोमनाथ यांनी एर्नाकुलम येथील महाराजा कॉलेजमधून प्री-डिग्री प्रोग्राम पूर्ण केला आहे. यानंतर त्यांनी केरळ विद्यापीठातील टीकेएम कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग, क्विलन येथून मेकॅनिकल इंजिनीअरिंग केले आहे. तसेच त्यांनी इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ सायन्सेस (IISc) मधून एरोस्पेस अभियांत्रिकीमध्ये पदव्युत्तर पदवी मिळवली. रॉकेट डायनॅमिक्स आणि कंट्रोलमध्ये त्यांचे विशेष कौशल्य आहे.
1985 मध्ये पदवी शिक्षक पूर्ण केल्यानंतर एस. सोमनाथ विक्रम साराभाई स्पेस सेंटरमध्ये रुजू झाले. सुरुवातीच्या टप्प्यात ते PSLV प्रकल्पासोबत काम करत होते. त्यानंतर त्यांना 2010 मध्ये GSLV Mk-3 रॉकेटचे प्रकल्प संचालक बनवण्यात आले. 2015 मध्ये ते LPSC चे प्रमुख बनले. 2018 मध्ये ते व्हीएसएससीचे संचालक झाले.




























































