‘हिरा फेरी’ लवकरच

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

‘अल्ट्रा झकास’ मराठी ओटीटीवर ‘हिरा फेरी’ हा चित्रपट पाहायला मिळणार आहे. या चित्रपटात कॉमेडी क्वीन अभिनेत्री निर्मिती सावंत यांचा मुलगा अभिनय सावंत आणि ‘बॉईज 2’ फेम अभिनेत्री शुभांगी तांबळे यांची जोडी बहर आणणार आहे. त्यांच्यासोबत अभिनेते विजय पटवर्धन, दिगंबर नाईक, स्टॅण्डअप कॉमेडी स्टार नवीन प्रभाकर, नितीन बोधरे आदी कलाकारांच्या प्रमुख भूमिका आहेत.

या चित्रपटाचे दिग्दर्शन अमोल बिडकर यांनी केले आहे. महाराष्ट्रातील ग्रामीण-शहरी प्रेक्षकांच्या पसंतीचे खुमासदार विषय आणि त्याला मनोरंजनाचा झकास गावरान तडका असे भलेमोठे पॅकेज अल्ट्रा झकासवर मराठी ओटीटीवर पाहायला मिळत आहे. ‘बोल हरी बोल’ या चित्रपटानंतर असाच रंजक फॉर्मुला ‘हिरा फेरी’मध्ये पाहायला मिळेल.