नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरण येत्या वर्षापासून, शालेय शिक्षणमंत्र्यांची माहिती

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा
प्रातिनिधिक फोटो

नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरण 2020 राज्यात येत्या शैक्षणिक वर्षापासून राबवण्यात येणार आहे. यासाठी अभ्यासक्रम आराखडा अंतिम करण्यासाठी प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे, अशी माहिती शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांनी विधान परिषदेत दिली.

नवीन राष्ट्रीय शैक्षणिक कधीपासून राबवण्यात येणार, यासंदर्भात निरंजन डावखरे यांनी लक्षवेधी सूचना मांडली होती.

केसरकर म्हणाले, नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरणात पायाभूत स्तर, शालेय शिक्षण, शिक्षक शिक्षण आणि प्रौढ शिक्षण अशा चार टप्प्यांचा आराखडा आहे. हे धोरण राज्यात राबवताना त्यात अनुरूप बदल करण्यात येऊन राज्याचा आराखडा तयार झाल्यानंतर त्यावर आधारित अभ्यासक्रम तयार करण्यात येणार आहे. यासाठी तज्ञांची समिती नेमण्यात येत आहे. या समितीचे काम मे महिन्यापर्यंत पूर्ण करण्यात येऊन येत्या शैक्षणिक वर्षापासून हे धोरण राबवण्यात येणार आहे. याअंतर्गत बोलीभाषा संवर्धनासाठीदेखील प्रयत्न करण्यात येईल, असेही त्यांनी सांगितले. यावेळी चर्चेत अभिजित वंजारी यांनी सहभाग घेतला.