
सामना ऑनलाईन । मुंबई
सध्या सोशल मीडियावर एक पोस्टर प्रदर्शित होताना दिसत आहे. त्यावर आरॉन असं नाव दिसतंय. तसंच त्या पोस्टरमध्ये शशांक केतकर आणि अजून तीन कलाकार दिसत आहेत. थंड प्रदेशात असलेल्या एका बाकड्यावर हे चारही जण बसलेले दिसत असून त्यांच्या चेहऱ्यावर गंभीर भाव दिसत आहेत.
अर्थात या पोस्टवरून हा एखादा चित्रपट असावा हे तर स्पष्ट होत आहे. मात्र, तो कधी प्रदर्शित होणार, नेमकी कथा काय किंवा आरॉन या शब्दामागे काय अर्थ दडलाय, हे मात्र अद्याप गुलदस्त्यात आहे. या चित्रपटात अभिनेता शशांक केतकर मुख्य भूमिकेत दिसणार आहे, हेही या पोस्टरवरून उघड होत आहे. अर्थात हा चित्रपट कोणता आहे, हे कळण्यासाठी काही काळ वाट बघावी लागणार आहे.



























































