नांदेड-संभाजीनगर नवीन रेल्वेचे परभणीत जोरदार स्वागत

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

नांदेड-संभाजीनगर विशेष दैनंदिन रेल्वेचे परभणी स्थानकावर मराठवाडा रेल्वे प्रवाशी महासंघातर्फे ढोल ताशे वाजवून जोरदार स्वागत करण्यात आले. या वेळी रेल्वेचे दोन्ही चालक व परभणीचे स्टेशन मास्तर देवीदास भिसे यांचा पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला. सर्व प्रवाशांना पेढे वाटून आनंद व्यक्त करण्यात आला.

नांदेड-संभाजीनगर या नवीन रेल्वेला पहिल्याच दिवशी मिळालेला उत्तम प्रतिसाद पाहता रेल्वेला आणखी 7 डब्बे वाढवून एकूण 15 कोचेसची सुविधा देण्यात यावी. त्यात एक एसी आणि चार आरक्षण कोचेसची सुविधा उपलब्ध करून देण्याची गरज आहे. सकाळी 4 च्या देवगिरी नंतर दुपारी 12 च्या सचखंड एक्सप्रेसपर्यंत संभाजीनगर येथून परभणीकडे जाण्यासाठी रेल्वे नाही, हे लक्षात घेता सकाळी 7 ला संभाजीनगर-अकोला नवीन मेमो लोकल तात्काळ सुरू करण्यात यावी. बहुप्रतिक्षित नांदेड-मुंबई आणि संभाजीनगर-नागपूर नवीन दैनंदिन एक्सप्रेस गाड्यांना तत्काळ सुरू करण्यात यावे. मनमाड-परभणी, पूर्णा-अकोला आणि परभणी-परळी दरम्यान नवीन दोहेरीकरणला मंजुरी देण्याची मागणी मराठवाडा रेल्वे प्रवाशी महासंघाने केली आहे. महासंघाचे अरुण मेघराज, राजेंद्र मुंडे, डॉ. राजगोपाल कालानी, श्रीकांत गडप्पा आदींनी ही मागणी केली आहे.