
महाराष्ट्राच्या राजकारणातून फडणवीसांनी बाजूला लोटलेल्या विनोद तावडे यांचा राष्ट्रीय राजकारणात मात्र दबदबा वाढत आहे. आगामी लोकसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर केंद्रीय नेतृत्वाकडून तावडे यांच्यावर भाजपात नवी जबाबदारी सोपविण्यात आली आहे. 2024 च्या निवडणूक रणनीती समितीच्या निमंत्रकपदी त्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. तावडे यांची मोदी-शहा यांच्याशी जवळीक वाढल्याचे हे द्योतक असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात आहे.
देवेंद्र फडणवीस सरकारमध्ये मंत्री असलेल्या विनोद तावडे यांना 2019 च्या विधानसभा निवडणुकीत उमेदवारी नाकारण्यात आली. त्यानंतर सुरुवातीला तावडे यांच्याकडे सर्वप्रथम राष्ट्रीय चिटणीस पदाची जबाबदारी देण्यात आली आणि पुढे भाजपच्या राष्ट्रीय सरचिटणीसपदी त्यांची नियुक्ती करण्यात आली. मध्यंतरीच्या काळात त्यांनी बिहार आणि हरयाणाच्या प्रभारीपदाची जबाबदारीही सोपविण्यात आली होती. त्यापाठोपाठ पुन्हा एकदा तावडे यांची निवडणूक रणनीती समितीच्या निमंत्रकपदी नियुक्ती करून लोकसभा निकडणुकीच्या दृष्टीने महत्त्कपूर्ण जबाबदारी सोपकविण्यात आली आहे.




























































