‘स्वच्छ भारत’नंतर आता प्लॅस्टिक मुक्ती अभियान

248

स्वच्छ भारतला लाभलेल्या यशानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आताप्लॅस्टिकमुक्त भारतचा नारा दिला आहे. राष्ट्रपिता महात्मा गांधी यांची यंदाची 150 वी जयंती भारतमातेला प्लॅस्टिकमुक्त बनवून साजरी करूया, असे आवाहन मोदी यांनी रविवारीमन की बातकार्यक्रमाद्वारे देशवासीयांना केले.

देशाला प्लॅस्टिकचा घट्ट विळखा पडला आहे. पर्यावरणापुढील हे भयंकर संकट दूर करण्यासाठी पंतप्रधान मोदी यांनी महत्त्वपूर्ण पाऊल टाकले आहे. स्वातंत्र्यदिनी देशवासीयांना संबोधित करताना त्यांनी प्लॅस्टिकच्या वापराला आळा घालण्याबाबत भाष्य केले होते. रविवारीमन की बातमध्ये बोलताना त्यांनीप्लॅस्टिकमुक्त भारतही चळवळ उभारण्यासाठी देशवासीयांना सामूहिक प्रयत्नांचे आवाहन केले. 2 ऑक्टोबर रोजी राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या 150व्या जयंतीचे औचित्य साधून नव्या क्रांतीची पायाभरणी करूया, पर्यावरण वाचवण्यासाठी पावले उचलणे गरजेचे आहे, असे पंतप्रधान मोदी म्हणाले.

आपली प्रतिक्रिया द्या