1 सप्टेंबरपासून अनेक मोठे बदल होणार आहेत, ज्याचा थेट परिणाम सर्वसामान्यांच्या खिशावर होण्याची शक्यता आहे. यामध्ये आधार कार्ड, क्रेडिट कार्ड, एलपीजी सिलेंडरचा समावेश आहे. याशिवाय सरकार केंद्रीय कर्मचाऱ्यांना महागाई भत्त्यात (DA वाढ) भेट देऊ शकते. या बदलांमध्ये जाणून घेऊया बदलेले नियम.
LPG सिलिंडरच्या किमतीत होणार बदल
प्रत्येक महिन्याच्या 1 तारखेला घरगुती आणि व्यावसायिक सिलिंडरच्या किमती जाहीर केल्या जातात. सरकारी पेट्रोलियम कंपन्या दर महिन्याच्या पहिल्या दिवशी एलपीजीच्या किमतीत बदल करतात. पाच राज्यांतील निवडणुका लक्षात घेता, सप्टेंबरमध्ये घरगुती सिलिंडरच्या दरात वाढ होण्याची शक्यता आहे. गेल्या महिन्यात व्यावसायिक गॅसची किंमत 8.50 रूपयांनी वाढली होती, तर जुलैमध्ये त्याची किंमत 30 रूपयांनी कमी झाली होती.
बनवाट कॉल्स संबंधित नियम
1 सप्टेंबरपासून फेक कॉल्स आणि मेसेजवर नियंत्रण ठेवता येणार आहे, कारण ट्रायने टेलिकॉम कंपन्यांना फेक कॉल्स आणि फेक मेसेजवर नियंत्रण ठेवण्याचे निर्देश देण्यात आले आहेत, यासाठी ट्रायने कठोर मार्गदर्शक सूचना जारी केल्या आहेत. TRAI ने Jio, Airtel, Vodafone, Idea, BSNL यांसारख्या दूरसंचार कंपन्यांना 30 सप्टेंबरपर्यंत टेलिमार्केटिंग कॉल्स आणि 140 मोबाईल नंबर सीरिजपासून सुरू होणारे व्यावसायिक मेसेजिंग ब्लॉकचेन आधारित DLT म्हणजेच डिस्ट्रिब्युटेड लेजर टेक्नॉलॉजी प्लॅटफॉर्मवर बदलण्याचे आदेश देण्यात आले आहेत.
क्रेडीट कार्डच्या नियंमामध्ये होणार बदल
HDFC बँकेने युटिलिटी व्यवहारांवर रिवॉर्ड पाँइट्सची मर्यादा निश्चित केली आहे, हा नियम 1 सप्टेंबरपासून म्हणजेच उद्यापासून लागू होणार आहेत. या अंतर्गत, ग्राहकांना या व्यवहारांवर दरमहा केवळ 2,000 पॉइंट मिळू शकतात. थर्ड पार्टी अॅपद्वारे पेमेंट केल्यास HDFC बँक पॉइंट देणार नाहित.
महागाई भत्त्यात वाढ होण्याची शक्यता
केंद्र सरकार सप्टेंबरमध्ये कर्मचाऱ्यांसाठी मोठी घोषणा करण्याची शक्यता आहे. सरकार कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात 3 टक्क्यांनी वाढ करण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. सध्या सरकारी कर्मचाऱ्यांना 50 टक्के महागाई भत्ता दिला जात आहे, येणाऱ्या महिन्यात बदल केल्यास 53 टक्के महागाई भत्ता मिळण्याची शक्यता आहे.
मोफत आधार अपडेट
मोफत आधार कार्ड अपडेट करण्याची अंतिम तारीख 14 सप्टेंबर निश्चित करण्यात आली आहे. यानंतर, तुम्ही आधारशी संबंधित काही गोष्टी मोफत अपडेट करू शकणार नाही. 14 सप्टेंबरनंतर आधार अपडेट करण्यासाठी शुल्क भरावे लागणार आहे. तथापि, यापूर्वी मोफत आधार अपडेटची अंतिम तारीख 14 जून 2024 होती, ती 14 सप्टेंबर 2024 पर्यंत वाढवण्यात आली होती.