
नवीन तसेच ज्येष्ठ कवींचा ‘नवंकोरं’ हा कार्यक्रम नुकताच दादर-माटुंगा कल्चरल सेंटरमध्ये सादर झाला. त्याला प्रेक्षकांचा खूप चांगला प्रतिसाद मिळाला. वायर्ड एक्स्प्रेसन आणि ठिक्करबिल्ला निर्मित, संकल्प थिएटर आणि कल्चरल ऍकॅडमी, मुंबई यांनी या कार्यक्रमाचे आयोजन केले. नव्या दमाच्या तरुण कवींनी एकत्र येऊन जुने आणि नवे प्रवाह एकत्र करत कवितांची नवी चळवळ उभारण्याचे ठरवले आहे. संकेत अरुण म्हात्रे, प्रथमेश किशोर पाठक, आदित्य प्रवीण दवणे आणि स्पृहा जोशी यांनी आपल्या कविता, गझल, गप्पांमधून प्रेक्षकांना काही नवं देण्याचा प्रयत्न केला. स्वरचित कवितांमधून वेगळे विषय हाताळत स्वतंत्र शैलीत त्यांनी कविता सादर केल्या.


























































