नव्या वर्षात लग्न करताय? मग ही घ्या मुहू्र्तांची यादी

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा
प्रातिनिधिक फोटो

सरतं वर्षं म्हणजेच 2020 हे अनेक अर्थांनी अतिशय वाईट होतं. कोरोनासारखी महामारी, नैसर्गिक आपत्ती, बिघडलेलं अर्थचक्र, जीवनात आलेली अस्थिरता यांमुळे 2020 सगळ्यांनाच तापदायक ठरलं. त्यामुळे सरत्या वर्षाला निरोप देताना आता येणाऱ्या नवीन वर्षाची चाहूल सगळ्यांना लागली आहे.

मुख्य म्हणजे, यंदा खोळंबा झालेली किंवा ठरून पुढे गेलेली लग्नं पुढील वर्षी करण्याची तयारी अनेकांनी केली आहे. अशासांठी ज्योतिषांनी पुढील वर्षीच्या विवाह मुहूर्तांची यादीच जाहीर केली आहे.

हिंदु पंचागानुसार 2021 सालात फारच कमी विवाह मुहूर्त आहेत. वर्षाच्या पहिल्याच म्हणजे जानेवारी महिन्यात केवळ एकच मुहूर्त असून तो 18 जानेवारीला आहे.

ज्योतिषशास्त्रानुसार, 18 जानेवारीनंतर गुरु आणि शुक्र ग्रहांमुळे एकही विवाहमुहूर्त नाही, मात्र मकरसंक्रांतीनंतर 19 जानेवारी ते 16 फेब्रुवारीपर्यंत गुरु ग्रहाचा अस्त होत आहे. यामुळे या काळात विवाहास योग्य काळ नाही.

22 एप्रिलच्या देवशयनी एकादशीनंतर 15 जुलैपर्यंत विवाह मुहूर्त आहेत. यादरम्यान 37 विवाह मुहूर्त आहेत. तसेच 15 नोव्हेंबरला कार्तिकी एकादशीपासून 13 डिसेंबरपर्यंत विवाहाचे एकूण 13 मुहूर्त आहेत.

यावर्षी 16 फेब्रुवारी रोजी वसंतपंचमी आहे. शास्त्रानुसार मंगल कार्य करण्याकरिता हा दिवस योग्य मानला जातो, मात्र या दिवशी सूर्योदयाच्या काळात शुक्रताऱ्याचा अस्त होणार असल्याने या दिवशी विवाहयोग नाही.

2021 मधले विवाह मुहूर्त

जानेवारी – 18
एप्रिल – 22, 24,25,26, 27, 28, 29 आणि 30
मे – 1, 2, 7, 8. 9, 13, 14, 21, 22, 23, 24, 25, 26, 28, 29 आणि 30

जून – 3, 4, 5, 16, 20, 22, 23, 24
जुलै – 1,2, 7, 13 आणि 15
नोव्हेंबर – 15, 16,20, 21, 28, 29 आणि 30

डिसेंबर – 1,2, 6, 7, 11 आणि 13