पुण्यात दीरांच्या छळाला कंटाळून नवविवाहितेची आत्महत्या

प्रातिनिधिक फोटो

पुण्यात दोन दीरांसह जावेच्या छळाला कंटाळून नवविवाहितेने गळफास घेउन आत्महत्या केली. बुधवारी ही घटना घडली असून या प्रकरणी तीन जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

दीपिका शाम नारायणकर (वय 24, रा. गणेशखिंड रस्ता) असे आत्महत्या केलेल्या महिलेचे नाव आहे. याप्रकरणी दीर सचिन राजेंद्र नारायणकर, शरद नारायणकर आणि शैला शरद नारायणकर यांच्याविरुद्ध चतुःशृंगी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दीपिका आणि शामचे 19 मार्च रोजी लग्न झाले होते. लग्नानंतर काही दिवसांनी दीर सचिन आणि शरद यांच्यायसह शैलाने दीपिकाचा शारिरीक व मानसिक छळ सुरु केला. सातत्याने शिवीगाळ आणि मारहाण केली. या छळाला कंटाळून दीपिकाने राहत्या घरात गळफास घेउन आत्महत्या केली. याप्रकरणी सहायक पोलीस निरीक्षक विशाल पवार तपास करीत आहेत.

आपली प्रतिक्रिया द्या