
राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण अर्थात एनएचएआयने दररोज महामार्ग किंवा एक्सप्रेसवेवर कारने प्रवास करणाऱ्या लोकांसाठी फास्टॅग पास जारी केले आहेत. 15 ऑगस्ट रोजी हे पास कार्यरत झाले. प्राधिकरणाने दिलेल्या माहितीनुसार, अवघ्या चार दिवसांत 5 लाखांहून अधिक फास्टॅग वार्षिक पास विकले गेले आहेत. त्यामुळे 150 कोटी रुपयांचा महसूल मिळाला आहे. सर्वाधिक फास्टॅग पास खरेदी करणाऱया लोकांमध्ये तामिळनाडूचे लोक आहेत. यानंतर, कर्नाटक आणि हरियाणामध्ये राहणाऱया लोकांनी त्यांच्या फास्टॅगवर हा पास सक्रिय केला. कर्नाटक आणि आंध्र प्रदेशमध्येही टोल प्लाझावर फास्टॅग वार्षिक पासद्वारे सर्वाधिक व्यवहार झाले. खाजगी वाहने आता राष्ट्रीय महामार्ग आणि द्रुतगती महामार्गावरील टोल प्लाझावरून मुक्तपणे प्रवास करण्यासाठी वार्षिक टोल पास वापरू शकतात. प्रत्येक पासची किंमत तीन हजार रुपये आहे. टोल प्लाझावर कार, जीप आणि व्हॅन या सुविधेचा वापर करू शकतात.