
वाळूचे ट्रक चालू देण्यासाठी व त्यावर कारवाई न करण्यासाठी 1 लाख 80 हजारांची लाच मागणी करण्यात आली. तडजोडीत 1 लाख 50 हजार निलंगा तहसीलदार यांच्या घरासमोर त्यांच्या खाजगी एजंटाने स्विकारले आणि लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने त्यास रंगेहाथ पकडले.
या बाबत अधिक माहिती अशी की, निलंगा तालुक्यात वाळूचे तीन ट्रक चालू देण्यासाठी व त्यांच्या वाहनावर कारवाई न करण्यासाठी प्रती महिना 30 हजार रुपये ची मागणी करण्यात आली होती. मागील तीन महिण्याची रक्कम 1 लाख 80 हजार रुपये मागीतले मात्र तडजोडीत 1 लाख 50 हजार रुपये ठरले. आज ही रक्कम तहसीलदार यांचे एजंट म्हणून रमेश गुंडेराव मोगरगे (रा. शेंद ता. निलंगा) याने तहसीलदार यांच्या घरासमोर स्विकारली.
लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने लावलेल्या सापळ्यात तो अडकला. निलंगा तहसीलदार गणेश दिगंबरराव जाधव यांना ही लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने ताब्यात घेतले. पुढील तपास उपअधिक्षक पंडित रेजीतवाड हे करत आहेत. पोलीस निरीक्षक भास्कर पुल्ली व त्यांच्या सहकाऱ्यांनी ही कारवाई केली.

























































