
कर्नाटक राज्यातुन महाराष्ट्रात चोरीच्या मार्गाने गुटखा येत असलेल्याची गुप्त माहिती निलंगा पोलीसांना मिळाल्याने तेथील कर्तव्यावर असलेले पो.उ.निरीक्षक जी.जे.क्षिरसागर यांनी औराद ते निलंगा जाणारे राष्ट्रीय महामार्गावर गस्त घालुन 27 लाखाच्या गुटख्याचा ट्रक पकडला.
निलंगा येथे पोलिसांकडून निलंगाकडे जाणाऱ्या ट्रकची पाहणी केली. त्या ट्रकमध्ये महाराष्ट्र शासनाने बंदी घातलेला गोवा या ब्रँडच्या गुटख्याच्या 33 गोण्या होत्या. या सर्व मालाची किंमत 27 लाख असून जप्त केलेल्या ट्रकची किंमत अंदाजे दहा लाख असा एकुण 37 लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त केला.
सदरील प्रकरणी फिर्यादी अन्न सुरक्षा अधिकारी दयानंद पाटील रा.लातूर यांच्या फिर्यादी वरून आरोपी ट्रॅक चालक रुकमोद्दीन इमाम इनामदार, ट्रॅक मालक विनोदकुमार कोटे, सिकंदर समीर शेख, शुभम ट्रेडर्स यांच्या विरोधात निलंगा पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद झाला आहे व पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक क्षिरसागर करीत आहेत.

































































