निलोफर खान पहिल्या महिला कुलगुरू

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

जम्मू आणि कश्मीरचे लेफ्टनंट गव्हर्नर मनोज सिन्हा यांनी आज कश्मीर विद्यापीठाच्या पहिल्या महिला कुलगुरूपदी प्रोफेसर निलोफर खान यांची नियुक्ती केली आहे. निलोफर या होम सायन्स डिपार्टमेंटच्या प्रोफेसर असून पुढील तीन वर्षांसाठी त्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. यापूर्वी या पदावर प्रोफेसर तलत अहमद कार्यरत होते. ऑगस्ट 2021 मध्ये त्यांचा कार्यकाळ संपला होता.