निरुपणकार डॉ. श्री. आप्पासाहेब धर्माधिकारी यांचे जनतेला कोरोनाविषयी आवाहन

3469

कोरोना विषाणूपासून बचाव करण्यासाठी शासन सर्वतोपरी सूचना नागरिकांना देत आहेत. रेवदंडा येथील थोर निरुपणकार, पद्मश्री डॉ. श्री. आप्पासाहेब धर्माधिकारी यांनीही जनतेला आवाहन केले आहे.

जनतेने हात स्वच्छ धुवावे, सॅनिटायझरचा वापर करावा, गर्दी टाळावी, हात मिळविण्यापेक्षा नमस्कार करा, कोरोना विषयी समाजात भीती न बाळगता आवश्यक ती काळजी घ्यावी, आपली जीवनावश्यक वस्तूची खरेदी करताना गर्दी होणार नाही याची दक्षता घ्यावी. कुठल्याही अफवांवर विश्वास न ठेवता शासनाकडून वेळोवेळी देण्यात येणाऱ्या सूचनांचे पालन करावे. सर्वांनी घरात राहून पोलीस प्रशासनाला सहकार्य करावे. आपण सर्व मिळून कोरोनावर मात करू असे आवाहन नागरिकांना डॉ. आप्पासाहेब धर्माधिकारी यांनी केले आहे.

आपली प्रतिक्रिया द्या