चंद्रपूर जिल्ह्याला निसर्ग चक्रीवादळाचा फटका, नुकसानीचे पंचनामे करण्याचे आदेश

683

चंद्रपूर जिल्ह्यात निसर्ग वादळामुळे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. झालेल्या नुकसानीचे तातडीने पंचनामे करून नुकसान भरपाईचे आदेश मदत व पुर्नवसन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी दिले आहे.

आपत्ती व्यवस्थापन व मदत-पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार शनिवारपासून ते राज्यातील प्रभावग्रस्त नऊ जिल्ह्यांना भेटी देऊन जिल्हाधिकाऱ्यांशी प्रत्यक्ष बैठकाही करणार आहेत. नुकसान झालेल्या जिल्ह्यांना तातडीनं मदत देण्याची आमची भूमिका असून त्यासाठीच जिल्हाधिकाऱ्यांना पंचनामे तातडीनं करण्याचे आदेश दिल्याचं त्यांनी सांगितलं.

 

आपली प्रतिक्रिया द्या