निसर्ग चक्रीवादळामुळे झालेल्या नुकसानीची उपमुख्यमंत्र्यांनी केली पाहणी, केंद्राचे पथकही येणार

394

उपमुख्यमंत्री तथा पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार यांनी निसर्ग चक्रीवादळामुळे मावळ तालुक्यात झालेल्या नुकसानीची आज शुक्रवारी पाहणी केली. तसेच नुकसानीचे तात्काळ पंचनामे करण्याचे आदेश संबंधितांना दिले आहेत. यावेळी मावळ तालुक्याचे आमदार सुनील शेळके, जिल्हाधिकारी नवल किशोर राम उपस्थित होते.

निसर्ग वादळ – नुकसानग्रस्त रायगडला 100 कोटींची तात्काळ मदत, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची घोषणा

आंबी एमआयडीसी परिसरात झालेल्या नुकसानीची उपमुख्यमंत्री पवार यांनी पाहणी केली. त्यानंतर मावळ तालुक्यातील भोयरे व पवळेवाडी येथील झालेल्या नुकसानीची पाहणी केली. पवळेवाडी येथील पॉलीहाऊसचीही पहाणी केली.

save_20200605_144238

निसर्ग चक्रीवादळामुळे मावळ तालुक्यात अनेक ठिकाणी घरावरील, शाळेवरील पत्रे उडाल्याच्या घटना घडल्या आहेत. तसेच विद्युत खांब पडले आहेत. त्यामुळे तालुक्यातील वीजपुरवठा काही काळ खंडित झाला होता. अनेक ठिकाणी झाडे पडल्याने देखील मोठे नुकसान झाले आहे. मावळ तालुक्यात फुलशेती आणि अन्य शेतीसाठी पॉलिहाऊस वापरले जातात. या वादळात पॉलिहाऊसचे देखील नुकसान झाले आहे.

save_20200605_144257

पालकमंत्री पवार म्हणाले, ‘निसर्ग चक्रीवादळामुळे रायगड आणि पुणे जिल्ह्यातील काही तालुक्यात मोठे नुकसान झाले आहे. या नुकसानीचे पंचनामे करण्याचे आदेश दिले आहेत. त्यासाठी पाहणी दौरा आयोजित करण्यात आला आहे. शनिवारी लोकप्रतिनिधी व शासकीय अधिकारी यांची बैठक आयोजित करण्यात आली असून त्यात योग्य ते निर्णय घेवून मदत केली जाणार आहे. राज्य शासनाने केंद्र सरकारकडे मदत मागितली असून केंद्रीय पथक पहाणी करण्यासाठी येणार असल्याचेही पवार म्हणाले.

आपली प्रतिक्रिया द्या