
हिंदुस्थानच्या खेळाडूंनी टोकियो पॅरालिम्पिकमध्ये रविवारी पदकांची लयलूट करून खऱया अर्थाने राष्ट्रीय क्रीडादिन साजरा केला. सकाळी भाविनाबेन पटेल हिने टेबल टेनिसमध्ये रौप्यपदक जिंपून हिंदुस्थानला पहिले पदक जिंकून दिले. त्यानंतर निशाद कुमारने उंच उडीत रुपेरी यश संपादन केले, तर विनोद कुमारने थाळीफेकमध्ये कास्य पदकाची कमाई केली.

21 वर्षीय तृतीय मानांकित निशाद कुमारने 2.06 मीटर उंच उडी मारून आपल्या वैयक्तिक विक्रमाची पुनरावृत्ती करत रौप्य पदकावर नाव कोरले. पदकाला गवसणी घालून त्याने नवा आशियाई विक्रमही केला. हिंदुस्थानच्या राम पाल याला 1.94 मीटर उडीसह पाचव्या स्थानावर समाधान मानावे लागले. जागतिक क्रमवारीत दुसऱया स्थानी असलेल्या अमेरिकेच्या रॉड्रिक टाउनसेंडने 2.15 मीटर उंच उडी मारत नव्या विश्वविक्रमासह सुवर्ण पदकाला गवसणी घातली. अव्वल मानांकित अमेरिकेच्या डॅल्लस वाईजला 2.06 मीटर उडीसह कास्य पदकावर समाधान मानावे लागले.
आशियाई विक्रमासह कास्य
विनोद पुमारने थाळीफेक स्पर्धेच्या एफ-52 प्रकारात 19.91 मीटर थाळी फेपून आशियाई विक्रमासह कास्य पदकाची कमाई केली. विनोदने अंतिम फेरीत 17.46 मीटर थाळी फेपून आपल्या अभियानास प्रारंभ केला. त्यानंतर उर्वरित पाच प्रयत्नांत त्याने 18.32 मीटर, 17.80 मीटर, 19.20 मीटर, 19.91 मीटर व 19.81 मीटर अशी कामगिरी केली. पाचव्या प्रयत्नाने त्याला कास्य पदक मिळवून दिले. पोलंडच्या पिओट्र कोसेविक्झने 20.02 मीटर थाळीफेक करत सुवर्ण पदकाची कमाई केली, तर क्रोशियाच्या वेलिमीर सँडोरला 19.98 मीटर फेकीसह रौप्य पदकावर समाधान मानावे लागले.




























































