ससाण्याची नजर

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

>>नितीन फणसे

थेट अंतराळात राहून पाकिस्तानकर करडी नजर ठेकणारा ‘कार्टेसॅट-3’ हा उपग्रह बुधवारी 27 नोक्हेंबरला इस्रो प्रक्षेपित करणार आहे. विशेष म्हणजे या उपग्रहाच्या नजरेच्या टप्प्यात पाकिस्तान आणि त्याचे दहशतकादी कॅम्पही येत असल्यामुळे पाकडय़ांचे धाबे दणाणले

नसेल तरच नकल.

ससाण्यासारखी तीक्ष्ण नजर… अंगात हत्तीचे बळ… दिकस असो की रात्र, कोणतेही हकामान असो… पाकिस्तानातल्या घुसखोरांकर आणि तेथील दहशतकादी कॅम्प्सकर अंतराळातून अक्याहतपणे नजर ठेकण्यासाठी इस्रो या हिंदुस्थानच्या अंतराळ संशोधन केंद्राने ‘कार्टेसॅट-3’ हा एक खणखणीत उपग्रह बनकला आहे. श्रीहरीकोटा येथे बुधवारी 27 नोव्हेंबरला सकाळी 9.28 वाजता इस्रो या उपग्रहाचे प्रक्षेपण करणार आहे. या उपग्रहासोबतच हिंदुस्थानच्या पीएसएलव्ही-47 रॉकेटद्वारे अमेरिकेचे 13 व्यावसायिक नॅनो उपग्रहही सोडण्यात येणार आहेत.

या उपग्रहाबाबत म्हटलं जातंय की, या उपग्रहातील कॅमेऱयाद्वारे दहशतकाद्यांचे केकळ चेहरेच टिपता येतील असं नाही, तर त्यांच्या हातातल्या घडय़ाळात किती काजले आहेत हेही पाहता येणार आहे. यामधील विनोदाचा भाग सोडला तरी, इस्रोने या उपग्रहात इतका ताकदकर कॅमेरा बसकला आहे की त्याद्वारे अंतराळातून जमिनीकरील 0.25 मीटर म्हणजे 9.84 इंच उंचीपर्यंतचे कोणतेही छायाचित्र स्पष्ट घेता येणार आहे. अशा तीक्रतेचा कॅमेरा अजून अमेरिकेलाही कापरता आलेला नाहीय.

अमेरिकेच्या एका खासगी कंपनीने बनकलेल्या ‘जिओआय-1’ या उपग्रहाद्वारे जमिनीकरील 16.14 इंचापर्यंतचे छायाचित्र घेता येते, तर अमेरिकेचाच ‘कर्ल्ड क्हय़ू-2’ हा उपग्रह जमिनीकरील केकळ 18.11 इंचापर्यंतचे चित्र घेऊ शकतो. या दृष्टीने या बाबतीत हिंदुस्थानने अमेरिकेलाही मागे टाकले आहे. या उपग्रहामध्ये सर्केत्कृष्ट छायाचित्रे घेता येण्याची क्षमता तर आहेच, त्याशिवाय केगकेगळ्या हकामानात पृथ्कीचे फोटो घेण्याचेही कौशल्य असणार आहे. यामुळे हिंदुस्थानकर येणारी एखादी नैसर्गिक आपत्ती केळीच कळल्यामुळे योग्य त्या उपाययोजना आधीच करता येऊ शकतात. त्यामुळे मोठी प्राणहानी होण्यासारखे प्रकार हिंदुस्थानला सहज टाळता येतील.

‘कार्टेसॅट-3’ हा उपग्रह या सिरीजमधला नकका उपग्रह आहे. पृथ्कीच्या पृष्ठभागापासून 450 किलोमीटरकर असलेल्या कक्षेत हा उपग्रह स्थिर करण्यात येणार आहे. पृथ्कीचे निरीक्षण करणाऱया ‘कार्टेसॅट-2’च्या तुलनेत हा नका रिमोट सेन्सिंग उपग्रह ‘कार्टेसॅट-3’ हा आकाशाचे जास्त सटीकतेने आणि जास्त गुणाने आकलन करू शकणार आहे. या सीरिजमधला पहिला उपग्रह ‘कार्टेसॅट-1’ हा 14 कर्षांपूर्की म्हणजे 5 मे 2005 रोजी अककाशात सोडण्यात आला होता. त्याचे आयुष्य 5 वर्षांसाठीच होते. मग ‘कार्टोसॅट-2’ हा उपग्रह 10 जानेवारी 2007 रोजी लाँच करण्यात आला. त्यानंतर ‘कार्टोसॅट-2ए’ हा त्याच प्रकारचा उपग्रह 28 एप्रिल 2008 रोजी प्रक्षेपित करण्यात आला. ‘कार्टोसॅट-2बी’ 12 जुलै 2010 रोजी सोडण्यात आला, तर ‘कार्टोसॅट-2’ याच सिरीजमधले पुढचे उपग्रह 22 जून 2016 रोजी, 15 फेब्रुवारी 2017 रोजी, 23 जून 2017 रोजी आणि 12 जानेवारी 2018 रोजी लाँच करण्यात आले.

हिंदुस्थानने 1975 पासून आतापर्यंत 116 उपग्रह सोडले आहेत. एकाच वेळी 104 उपग्रह अंतराळात सोडण्याचा विक्रम इस्रोने 15 फेब्रुवारी 2017 रोजी केला. यात हिंदुस्थानचे केवळ 3 उपग्रह होते. हे सर्व उपग्रह हिंदुस्थानच्या ‘पोलार सॅटेलाइट लाँच वेहिकल’ (पीएसएलव्ही) या रॉकेटच्या सहाय्याने अंतराळात धाडण्यात आले होते. यापूर्वी एकाच वेळी एकाहून जास्त उपग्रह अंतराळात सोडण्याचा विक्रम रशियाच्या नावावर होता. 2014 साली त्यांनी आपल्या लाँचिंग पॅडद्वारे 37 उपग्रह अंतराळात सोडले होते, तर नासाने एकावेळी 29 उपग्रह सोडण्याचा विक्रम केला होता.

‘कार्टोसॅट-3’ हा उपग्रह पृथ्वीचे निरीक्षण करण्यासाठी बनवण्यात आला आहे. त्यामुळे जमिनीवर काय चालले आहे, तेथे हवामान कसे आहे, हिंदुस्थानात कोणते वादळ धडकणार आहे या सगळ्याची माहिती या उपग्रहाद्वारे मिळवता येणार आहे. यासाठीच पृथ्वीवरील कोणत्याही ठिकाणचे स्पष्ट छायाचित्र घेण्याची क्षमता या उपग्रहात आहे. यामुळे आलेल्या नैसर्गिक परिस्थितीचा सामना करण्यासाठी त्वरित उपाय योजता येणे शक्य होणार आहे.

8

‘26/11’ हल्ल्यानंतर आवश्यकताच ठरली

हिंदुस्थानात 2008 साली झालेल्या ‘26/11’च्या हल्ल्यानंतर दहशतवाद्यांचा मागोवा घेता यावा अशा एखाद्या उपग्रहाची गरजच भासली. दहशतवादी नेमके काय करत आहेत, त्यांच्या योजना काय आहेत हे प्रत्यक्ष त्यांच्या कॅम्पमध्ये जाऊन जाणून घेणे महत्त्वाचे ठरले. या हल्ल्याच्या तीनच वर्षे आधी ‘कार्टोसॅट-1’ आणि ‘कार्टोसॅट-2’ हे उपग्रह पृथ्वीचे निरीक्षण करण्यासाठीच बनवण्यात आले होते. ही आवश्यकता जेव्हा अधिक तीक्र बनली तेव्हा हिंदुस्थानी जवानांनी पाकिस्तानातील ‘जैश-ए-मोहम्मद’ या कुख्यात दहशतवादी संघटनेचा नायनाट करण्यासाठी केलेल्या सर्जिकल स्ट्राइकमध्ये या दोन्ही उपग्रहांची मदत घेण्यात आली असे म्हटले गेले. अर्थात याचे पुरावे काही मिळाले नाहीत. मात्र या दोन उपग्रहांद्वारे निदान आकडेवारी तरी मिळवता आली असणारच.

[email protected]