
सध्या राज्यात कोणतेच नवीन औष्णिक वीज निर्मिती प्रकल्प न उभारण्याचा राज्य सरकारने घेतला आहे, अशी माहिती राज्याचे ऊर्जामंत्री डॉ. नितीन राऊत यांनी आज दिली. वीजेच्या मागणीच्या 25 टक्के अपारंपरिक वीज वापरण्याचे बंधनकारक असल्याचे ते म्हणाले.
ऊर्जामंत्री डॉ. नितीन राऊत व अन्न व नागरी पुरवठा मंत्री आणि नाशिकचे पालकमंत्री छगन भुजबळ यांच्यासोबत झालेल्या बैठकीत त्यावेळी त्यांनी ही माहिती दिली. आर्थिक मंदीमुळे विजेच्या मागणीत 33 टक्क्यांची लक्षणीय घट झाल्याने बंद असलेले जुने वीज संच सध्या सुरू करता येणार नाही अशी माहिती त्यांनी दिली. सौर ऊर्जेला प्रोत्साहन देण्याचे सरकारचे धोरण असल्याने एकूण विजेच्या 25 टक्के वीज सौर ऊर्जा खरेदी करावी लागते नाशिकमधील एकलहरे प्रकल्प सुरू राहण्यासाठी शासन सकारात्मक असून येथील वीज निर्मितीची किंमत कमी करण्यासाठी प्रयत्न सुरू असल्याचे नितीन राऊत म्हणाले.



























































