
बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार आज राज्यपालांची भेट घेऊन सरकार स्थापन करण्याचा दावा करण्याची शक्यता आहे. एनडीए आमदारांच्या बैठकीनंतर नितीश कुमार राज्यपालांची भेट घेऊ शकतात. तसेच उद्या नितीश कुमार मुख्यमंत्रीपदाची शपथ घेण्याची दाट शक्यता आहे. काही वेळात पाटण्यात भाजप आणि जदयु आमदारांची वेगवेगळ्या बैठक होणार आहे. त्यानंतर एनडीए आमदारांची संयुक्त बैठक होणार आहे.
आज एनडीएची नेता निवडला जाईल अशी माहिती जदयुचे प्रदेशाध्यक्ष वशिष्ठ नारायण यांनी दिली. त्यनंतर राज्यापालांकडे सरकार स्थापनेचा दावा करणार असून उद्या शपथग्रहण होईल असेही वशिष्ठ यांनी नमूद केले.
नव्या मंत्रिमंडळात युवा चेहर्यांना संधी
आगामी बिहारच्या मंत्रिमंडळात युवा चेहर्यांना संधी दिली जाईल असे म्हटले जाते. तसेच अनेक नव्या चेहर्यांचाही मंत्रिमंडळात समावेश करण्यात येईल. मुख्यमंत्री जरी जदयुचा असला तरी मंत्रिमंडळात भाजपचा दबदबा असणार आहे.


























































