
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज बिहारमधील औरंगाबाद येथे अनेक सरकारी योजनांचे उद्घाटन केले. यावेळी मंचावर मुख्यमंत्री नितीश कुमारही उपस्थित होते. त्यांनी आपल्या भाषणादरम्यान असे काही विधान केले की पंतप्रधान मोदींनाही हसू आवरले नाही.
बिहारमध्ये अनेक कामं सुरू असून आता याला अधिक वेगाने पूर्ण करू. तुम्ही (पंतप्रधान मोदी) इथे आलात याचा आम्हाला आनंद आहे. तुम्ही याआधीही इथे आला होतात, पण आम्ही गायब होतो. मात्र तुम्हाला आश्वासन देतो की आता आयाराम-गयाराम सारखे होणार नाही. आता कायमच तुमच्यासोबत राहील, असे विधान मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी केले. हे ऐकून पंतप्रधान मोदी हसू रोखू शकले नाहीत.
नितीश कुमार यांनी गेल्या महिन्यात आरजेडीची साथ सोडत पुन्हा भारतीय जनता पक्षाशी युती केली आणि नव्याने मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. एकाच टर्ममध्ये तीन वेळा त्यांनी पलटी मारली तर आठवेळा मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा आणि नऊ वेळा बिहारचे मुख्यमंत्रीपद असा सत्तेचा खेळही मांडला. या घडामोडींनंतर विरोधी पक्षांनी ‘बिहारचे पलटूराम’ अशी खिल्ली उडवत नितीश कुमार यांच्यावर तोफ डागली होती.
…तेव्हा नितीश कुमार यांनी हात जोडून माफी मागितली होती, तेजस्वी यादव यांचा गौप्यस्फोट




























































