
बिहारचे मुख्यमंत्री नितीशकुमार लोकसभेतदेखील एनडीएला धक्का देण्याच्या तयारीत आहेत. लोकजनशक्ती (पारस) गटाचे तीन खासदार जेडीयू आणि आरजेडीच्या वाटेवर असल्याची चर्चा आहे. पेंद्रीय मंत्री पशुपती पारस यांनी एनडीएसोबत राहण्याची घोषणा केली आहे, मात्र खगडीया येथील खासदार महबूब अली पैसर आरजेडीमध्ये जाऊ शकतात, तर वैशाली येथील खासदार वीणा देवी आणि नवादा येथून खासदार असलेले चंदन सिंह हे जेडीयूमध्ये प्रवेश करण्याची शक्यता आहे.

























































