नितीश कुमार भाजपच्या कार्यक्रमांपासून दूर, राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या शपथविधीला उपस्थित राहणार नाहीत

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार आणि भाजप यांच्यात दूरी वाढत असल्याचे बोलले जात आहे. बिहारमध्ये अनेक दिवसांपासून राजकीय खेळी सुरू आहेत. अलीकडच्या काळात नितीश कुमार यांनी भाजपने आयोजित केलेल्या अनेक कार्यक्रमांपासून स्वतःला दूर ठेवले आहे. आता बिहारचे मुख्यमंत्री राष्ट्रपतींच्या शपथविधी सोहळ्यातही सहभागी होणार नाहीत.

मनरेगासंदर्भात आयोजित बैठकीत नितीश कुमार सहभागी झाल्यामुळे या कार्यक्रमात सहभागी होणार नसल्याचे जेडीयूच्या वतीने सांगण्यात आले आहे. यापूर्वी 17 जुलै रोजी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी बोलावलेल्या मुख्यमंत्र्यांच्या बैठकीतही ते सहभागी झाले नव्हते.

भाजपचे तारकिशोर प्रसाद हे राष्ट्रध्वजाच्या मुद्द्यांवर चर्चा करण्यासाठी आयोजित बैठकीला उपस्थित राहण्यासाठी बिहारहून आले होते.
शुक्रवारी त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी माजी राष्ट्रपती राम नाथ कोविंद यांच्यासाठी आयोजित केलेल्या डिनरला हजर लावली नाही. यावेळी त्यांनी विधानपरिषदेच्या सात नवनिर्वाचित सदस्यांच्या शपथविधी सोहळ्याचे कारण देत कार्यक्रमापासून दूर ठवले.

बिहार विधानसभेच्या शताब्दी सोहळ्याला पंतप्रधानांनी संबोधित केल्यानंतर भाजप आणि नितीश कुमार यांच्यातील वाद वाढत चालला आहे.

या कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी पंतप्रधान स्पीकर विजय कुमार सिन्हा यांच्या निमंत्रणावरून पोहोचले होते. ज्यांच्यासोबत मुख्यमंत्री नितीश कुमार यांचे संबंध फारसे चांगले राहिले नाहीत. समारोप समारंभात सिन्हा यांनी पाच वेळा राज्याचे मुख्यमंत्री राहिलेल्यांचा उल्लेखही केला नाही. यासोबतच याप्रसंगी प्रकाशित झालेल्या स्मरणिकेतूनही त्यांचा फोटो गायब होता.
विधानसभेच्या अध्यक्षांना हटवण्याबाबत, भाजप नेत्यांकडून राज्य सरकारवर जाहीर टीका करण्याबाबत भाजपकडून आतापर्यंत कोणतेही पाऊल उचलण्यात आलेले नाही.

विधानसभा निवडणुकीपासून भाजप आणि नितीश कुमार यांच्यात सतत संघर्ष सुरू आहे. गेल्या महिन्यात अग्निपथ योजनेबाबत राज्य भाजपचे प्रमुख संजय जयस्वाल आणि जेडीयू नेत्यांमध्ये जोरदार वाक् युद्ध झाले होते. त्यावेळी भाजपने अग्निपथ योजनेच्या विरोधाला सामोरे जाण्यात सरकारला अपयश असल्याचे म्हटले होते.

कॅबिनेट मंत्री विजेंदर यादव यांनी म्हटले आहे की, पूर्वी मर्यादा होती, नियंत्रण होते. आता त्याची कमतरता आहे. ही चांगली परंपरा नाही.