‘नो ड्यूज’ प्रमाणपत्र दिले, मनपाचे दोन कर्मचारी लटकले

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना प्रतिनिधी । नगर

महानगरपालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज भरणार्‍यांकडे थकबाकी असतांनाही त्यांना ‘नो ड्यूज’चे प्रमाणपत्र देण्यात आल्याच्या प्रकाराची महापालिका आयुक्तांनी गंभीर दाखल घेतली आहे. या संदर्भात मनपाकडे तक्रारही दाखल झाली असून त्यानुसार चौकशी होऊन थकबाकी असतांनाही ‘नो ड्यूज’ देणार्‍या राजेंद्र शिरसाठ व मोहन काळे दोन कर्मचाऱ्यांना निलंबित करण्यात आले आहे. उपायुक्त प्रदीप पठारे यांनी याबाबत आदेश बजावले आहेत.

महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये कर प्रमाणपत्र देण्यासंदर्भातील विषय न्यायालयामध्ये सुद्धा उपस्थित झाला होता. अनेक उमेदवार न्यायालयात गेल्यामुळे त्यासंदर्भातील विषय सुरू आहे. त्यामुळे प्रमाणपत्र कोणी दिले यावरून वाद सुरू होता. त्यानंतर मनपाने केलेल्या कारवाईमुळे अनेकांचे धाबे दणाणले आहे.