Operation Sindoor Debate : हिंदुस्थान आणि पाकिस्तानमध्ये कोणीही मध्यस्थ नव्हता, परराष्ट्र मंत्री जयशंकर यांचा दावा

हिंदुस्थान आणि पाकिस्तानमध्ये कोणीही मध्यस्थ नव्हता, असा दावा आज लोकसभेत ऑपरेशन सिंदूरवर चर्चेदरम्यान परराष्ट्र मंत्री एस जयशंकर यांनी केला आहे. हिंदुस्थान आणि पाकिस्तानात अमेरिकेने मध्यस्थी करून युद्धविराम घडवून आणला, असा दावा 25 हून अधिकवेळा डोनाल्ड ट्रम्प यांनी केला आहे. यावर स्पष्टीकरण देताना ते असं म्हणाले आहेत.

लोकसभेत बोलताना जयशंकर यांनी म्हणाले की, संयुक्त राष्ट्रांनी दहशतवादी हल्ल्याची निंदा केली, तर पाकिस्तानने टीआरएफचा (द रेझिस्टन्स फ्रंट) चा बचाव केला.

जयशंकर म्हणाले की, “7 मे रोजी सकाळी आम्ही पाकिस्तानला स्पष्ट संदेश दिला आणि त्यांना सबक शिकवला. आम्ही पाकिस्तानमधील दहशतवादी तळांवर हल्ले केले. हिंदुस्थनांने आपल्या नागरिकांच्या सुरक्षेसाठी हा अधिकार वापरला आहे. आता हिंदुस्थन परमाणु ब्लॅकमेलिंग सहन करणार नाही.”

जयशंकर यांनी पुढे म्हणाले की, हिंदुस्थान आणि पाकिस्तान यांच्यात कोणत्याही मध्यस्थाची भूमिका नव्हती. युद्धविरामासाठी आधी पाकिस्तानकडून विनंती करण्यात आली,” असा दावा त्यांनी केला.