
राज्यात सध्या स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणुकांची रणधुमाळी सुरू आहे. निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज भरण्यास सोमवारापासून सुरुवात झाली आहे. नगर परिषद निवडणुकीसाठी आजपासून उमेदवारी अर्ज भरण्यास सुरुवात झाली आहे. रत्नागिरी नगरपरिषदेत पहिल्या दिवशी एकही उमेदवारी अर्ज दाखल झाला नाही. उमेदवारी अर्ज भरण्याची अंतिम मुदत १७ नोव्हेंबर आहे.





























































