
सामना ऑनलाईन, सेंट जॉन्स
१३ हजार ५०० कोटींचा घोटाळा करून फरार झालेल्या मेहुल चोक्सीच्या प्रत्यार्पणासाठी आपण धडपड करत असल्याचा आव मोदी सरकार आणत असलं तरी तपास यंत्रणांकडून त्याच्या प्रत्यार्पणासाठी कोणतेही प्रयत्न झाले नसल्याची धक्कादायक बाब उघडकीस आली आहे. चोक्सी सध्या अँटीगा आणि बार्बुडामध्ये मजेत जगत आहे. तिथले परराष्ट्र मंत्री ई पॉल चेट ग्रीन यांनी चोक्सीसारख्या हरामखोरांना आमच्या देशात ठेवण्याची आमची इच्छा नाही मात्र हिंदुस्थानकडून अधिकृतरित्या त्याच्या प्रत्यार्पणासाठी कोणतीही विनंती केलेली नाही.
मुंबई मिरर या वृत्तपत्राच्या पत्रकाराने ग्रीन यांच्याशी फोवनरून संपर्क साधला होता. चोक्सीने अँटीगा आणि बार्बुडाचं नागरिकत्व विकत घेतलं आहे. तिथूनच आपण आपल्या व्यवसायाचा विस्तार करणार असल्याचं चोक्सीने त्याच्या वकीलांमार्फत सांगितलं आहे. चोक्सीसारखे भामटे, दरोडेखोर आपल्या देशाचं नागरिकत्व विकत घेऊन रहायला लागले तर काय होईल असा प्रश्न विचारत विरोधकांनी तिथल्या सत्ताधाऱ्यांना भंडावून सोडलं आहे. यानंतर परराष्ट्रमंत्र्यांनी चोक्सीसारख्या हरामखोरांना आम्ही आमच्या भूमीवर एक क्षणही ठेवण्यास तयार नाही असं विधान केलं आहे. मात्र आम्हाला हिंदुस्थानकडून त्याच्या प्रत्यार्पणासाठी २७ जुलै २०१८ पर्यंत एकदाही विनंती करण्यात आलेली नाही असं ग्रीन म्हणाले आहेत. हिंदुस्थानसोबत आमचे संबंध उत्तम असून ते खराब व्हावेत अशी आमची अजिबात इच्छा नाही, मात्र हिंदुस्थानकडून विनंतीच झाली नसल्याने आम्ही काहीही करू शकत नाही असं त्यांनी सांगितलंय.
हिंदुस्थान आणि अँटीगा-बार्बुडामध्ये प्रत्यार्पणासाठी करार झालेला नाही. असं असतानाही चोक्सीला हिंदुस्थानच्या हवाली करण्यासाठी आम्ही तपास यंत्रणा आणि सरकारी अधिकाऱ्यांसोबत बसून तोडगा काढायला तयार असल्याचं ग्रीन म्हणालेत. इतकी सगळी मदत करण्याची तयारी असतानाही हिंदुस्थानी अधिकाऱ्यांनी आणि तपास यंत्रणांनी विनंती न केल्याने सगळा घोळ होऊन बसला आहे. ही विनंती का करण्यात आली नाही हे देखील एक मोठं कोडं बनलं आहे.
नीरव मोदी आणि त्याचा मामा मेहुल चोक्सी हे जानेवारी महिन्यात फरार झाले आहेत. यातल्या मोदीचा निश्चित ठावठिकाणा अजून समजू शकला नसला तरी चोक्सी मात्र उजळ माथ्याने अँटीगा आणि बार्बाडोसमध्ये राहतोय. चोक्सीने आपल्याला हिंदुस्थानात परत येण्याची भीती वाटत असूबन परत आलो तर मॉब लिंचिंग म्हणजेच जमावाकडून ठेचून मारलं जाण्याची भीती वाटत असल्याचं म्हटलंय.
The Antigua and Barbuda government on Friday said it would consider deporting fugitive Indian businessman Mehul Choksi if India made such a request. There has been no formal communication from New Delhi seeking his arrest or cancellation of his citizenship says Antigua and Barbuda Foreign Minister E Paul Chet Greene























































