मुंबई विद्यापीठाचा पुनर्मूल्यांकनात भोंगळ कारभार, पाच वर्षे उलटूनही एलएलएमच्या विद्यार्थ्याला निकाल नाही

199

 

मुंबई विद्यापीठाच्या चुकीच्या कारभाराची शिक्षा ऑक्टोबर 2014 मध्ये एलएलएम सेमिस्टर-2ची परीक्षा देणार्‍या एका परीक्षार्थ्याला बसली आहे. पुनर्मूल्यांकनात पास होऊनदेखील मूळ निकालात गुण वाढविण्यात गोंधळ केल्याने या परीक्षार्थ्याला पाच वर्ष उलटूनही निकालाची प्रतच मिळालेला नाही. एलएलएमच्या निकालाअभावी या परीक्षार्थ्यांची एमफील आणि नेट-सेट परीक्षाही देता आलेल्या नाहीत.

निशांत दिवे, (नाव बदललेले) या परीक्षार्थ्याने ऑक्टोबर 2014 मध्ये एलएलएम सेमिस्टर 2 ची परीक्षा दिली. परीक्षेनंतर दोन ते तीन महिन्यात निकाल जाहीर झाला. या परीक्षेत निशांत हे environmental and international legal order या चौथ्या विषयात नापास झाले. त्यांनी पूनर्मूल्यांकनासाठी अर्ज केला असता ते या विषयात 51 गुणांसह पास झाले पण हे गुण चौथ्या विषयात न वाढविता आधीच पास असलेल्या पहिल्या विषयात (jidicial process) वाढीव गुण देण्यात आले. ही चूक निदर्शनास येताच निशांत यांनी विद्यापीठातील संबंधित अधिकार्‍यांना ही चूक दाखविली त्यांनी पूनर्मूल्यांकन विभागात जाऊन निकालात सुधारणा करण्यास सांगितले. दरम्यान पूनर्मूल्यांकन विभागात निशांत यांना टोलवाटोलवीची उत्तरे देण्यात आली. 2014 चे रेकॉर्ड आम्ही नष्ट केले आहेत. जुने रेकॉर्ड आम्ही ठेवत नाहीत, असे सांगण्यात आले. दरम्यान, याप्रकरणी निशांत यांनी कुलगुरूंकडे लेखी तक्रार केली आहे. विद्यापीठाच्या वेबसाईटवर सुधारित ऑनलाईन निकालाची प्रत आली. मात्र विद्यापीठातील अधिकारी या ऑनलाईन निकालानुसार निशांत यांना मूळ निकालाची प्रत द्यायला तयार नाहीत, असे स्टुंडंट लॉ कौन्सिलचे ऍड. सचिन पवार यांनी सांगितले.

निकालातील ही चूक गंभीर असून याप्रकरणाची चौकशी करून संबंधित अधिकार्‍यांना तातडीने कार्यवाही करण्याच्या सूचना देण्यात येतील.-  आशुतोष राठोड जनसंपर्क अधिकारी, मुंबई विद्यापीठ

आपली प्रतिक्रिया द्या