टीम इंडियाला स्पॉन्सर्स मिळेनात, हिंदुस्थानी संघाशी जोडले जाण्यासाठी कंपनी इच्छुक नाहीत

जगातील धनाढय़ क्रिकेट बोर्ड म्हणून ओळखल्या जाणाऱया बीसीसीआयला कोरोनाचा फटका बसला आहे. आयपीएलसाठी विवो कंपनीकडून मिळणारा कोटय़वधी रुपयांचा करार मोडीत काढल्यानंतर ड्रीम इलेव्हन कंपनीसोबत त्यांना तडजोड करावी लागली.

आता टीम इंडियाच्या खेळाडूंच्या पोशाखावर ज्या कंपनीचा लोगो वापरण्यात येतो त्या नाईकी कंपनीसोबतचा करार गेल्या महिन्यातच संपुष्टात आलेला आहे. या कालावधीत नवी पंपनी बीसीसीआयसोबत करार करण्यास इच्छुकही नाहीत. त्यामुळे आता टीम इंडियावर स्पॉन्सर्सविना ऑस्ट्रेलियाला जाण्याची आपत्ती ओढवण्याची दाट शक्यता निर्माण झाली आहे.

31 टक्के घसरण

बीसीसीआय व नाईकी यांच्यामध्ये गेली 15 वर्षे करार सुरू होता. प्रत्येक लढतीसाठी नाईकीकडून बीसीसीआयला 88 लाख रुपये मिळत होते. तसेच वर्षाला सहा कोटीही करारानुसार देण्यात येत होते. पण बीसीसीआयने नव्याने निविदा काढल्या तेव्हा प्रत्येक सामन्यासाठी 61 लाख रुपये इतकी रक्कम ठेवण्यात आली होती. याचा अर्थ 31 टक्के घसरण यामध्ये करण्यात आली होती. कोरोनाच्या काळात बाजारात आलेली मंदी लक्षात घेता बीसीसीआयला तोटा सहन करावा लागणार आहे.

आपली प्रतिक्रिया द्या