दिवाळीपूर्वी दिवाळं निघणार, घरगुती गॅस सिलिंडर 60 रुपयांनी महागला

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा
प्रातिनिधीक फोटो

सामना ऑनलाईन, मुंबई

देशभरात घरगुती गॅस सिलिंडरच्या किंमती वाढल्या असून दिवाळीपूर्वी झालेल्या या भाववाढीमुळे सामान्य माणसाची वाट लागणार आहे. विनाअनुदानित सिलिंडरची किंमत 60 रुपयांनी वाढली असून अनुदानित गॅसची किंमत २ रुपये ९४ पैशांनी वाढली आहे. बुधवारी मध्यरात्रीपासून ही भाववाढ लागू झाली आहे.

इंडीयन ऑईल कॉर्पोरेशनने दिलेल्या माहितीनुसार 14.2 किलोच्या अनुदानित सिलिंडरच्या किंमती 502.40/-रुपयांवरून 505.34/- रुपये इतकी झाली आहे. विनाअनुदानित सिलिंडरच्या किंमती 60 रुपयांनी वाढून 880 रूपये इतकी झाली आहे.