धक्कादायक! मुंबईत कुजलेल्या अवस्थेत आढळला अभिनेत्रीचा मृतदेह

‘द ट्रायल’ या वेब सीरिजमध्ये काजोलसोबत काम करणारी अभिनेत्री आणि कतार एअरवेजची माजी एअर होस्टेस नूर मालाबिका दास हीचे निधन झाले आहे. अभिनेत्री नूर ही तिच्या मुंबईतील घरात मृतावस्थेत आढळून आली. अभिनेत्रीने आत्महत्या केल्याचे बोलले जात आहे. इतक्या कमी वयात अभिनेत्रीच्या आकस्मिक निधनाच्या बातमीने सर्वांनाच धक्का बसला आहे.

अभिनेत्री नूर मलाबिका दास लोखंडवाला येथील एका अपार्टमेंटमध्ये राहत होती. काही दिवसांपूर्वी नूरच्या शेजाऱ्यांनी तिच्या घरातून दुर्गंध येत असल्याची तक्रार केली. त्यानंतर ओशिवरा पोलिसांनी याची दखल घेत तिच्या घराच्या दरवाजा तोडला. त्यावेळी नूरचा मृतदेह सडलेल्या अवस्थेत पंख्याला लटकलेल्या स्थितीत पोलिसांना आढळून आला. 6 जूनच्या आसपास तिचा मृत्यू झाला असावा, अशी शक्यता वर्तवण्यात येत आहे. पोलिसांनी तिच्या घरातून तिचा मोबाईल फोन आणि अन्य काही गोष्टी तपासासाठी ताब्यात घेतल्या आहेत.

दरम्यान पोलिसांनी अभिनेत्री नूर मालाबिका दासचा मृतदेह गोरेगाव येथील सिद्धार्थ रुग्णालयात शवविच्छेदनासाठी पाठवला. यानंतर पोलिसांनी नूर मालाबिका दासच्या कुंटुंबीयांशी संपर्क साधला. मात्र कोणाचीही माहिती मिळाली नाही. त्यामुळे पोलिसांनी रविवारी एका स्वयंसेवी संस्थेच्या मदतीने तिच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार केले. मात्र मृत्यूचे कारण अद्याप समोर आलेले नाही. पोलीस या प्रकरणाचा तपास करत आहेत.

कोण आहे नूर मलाबिका दास?

नूर मालाबिका दास ही मूळची आसाममधील आहे. तिने अनेक हिंदी चित्रपट आणि वेब सिरीजमध्ये काम केले होते. यामध्ये सिसाकियां, वॉकमन, मसालेदार चटणी, प्यूबिक रेमेडी, ऑर्गॅझम, देखी उंडेखी, बॅकरोड हस्टल इत्यादींचा वेब सिरीज तसेच चित्रपटात काम केले होते. डिस्ने प्लस हॉटस्टारवर स्ट्रीम झालेल्या ‘द ट्रायल’ मध्ये नूर मालाबिका दासने काजोल आणि जीशू सेनगुप्तासोबत एकत्र काम केले होते.