उत्तर हिंदुस्थानींची घरवापसी सुरूच!

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना ऑनलाईन, अहमदाबाद

गुजरातमधून पलायन करण्याचे उत्तर हिंदुस्थानींचे सत्र सुरूच असून, 60 हजारांवर नागरिक उत्तर प्रदेश, बिहारमध्ये परतल्याचे वृत्त आहे. दरम्यान, गुजरातमध्ये अनेक शहरांमध्ये बंदोबस्त वाढविला आहे. पोलिसांनी  आतापर्यंत 533 अटक केली आहे.

north-indian-leaving-gujrat

28 सप्टेंबरला साबरकांठा जिल्हय़ात 14 महिन्यांच्या बालिकेवर एका बिहारी नराधमाने बलात्कार केला. या घटनेनंतर गुजरातमध्ये संतप्त लाट उसळली. ‘यूपी-बिहारी भगाओ’ही मोहीम हाती घेण्यात आली आहे. गुजरातमध्ये उत्तर प्रदेश, बिहारमधील कामगार मोठय़ा प्रमाणावर आहेत.

north-indians-leaving-gujra

आतापर्यंत 60 हजार उत्तर हिंदुस्थानींनी गुजरातमधून पलायन केल्याचे उत्तर भारतीय विकास परिषदेचे अध्यक्ष श्यामसिंह ठाकूर यांनी सांगितले.  रेल्वे, बस, ट्रक आणि मिळेल त्या वाहनांमधून उत्तर प्रदेश, बिहारमधील लोक गुजरातमधून बाहेर पडत आहेत.

vijay-rupani1

गुजरातमधील हिंसाचाराला काँग्रेस जबाबदार आहे. काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी आता आपले आमदार अल्पेश ठाकोर यांच्यावर कारवाई करणार का?- विजय रुपानी (मुख्यमंत्री, गुजरात)

rahul-gandhi

बाहेरील राज्यांतील कामगारांवर हल्ले होणे हे गुजरातच्या उद्योग आणि अर्थव्यवस्थेसाठी चांगले नाही. पंतप्रधान मोदींनी तरुणांचा विश्वासघात केला आहे. बेरोजगारीमुळे तरुणांना नैराश्य आले असून, त्याचा संताप बाहेर पडत आहे. गुजरातमध्ये शांतता राखावी आणि सुरक्षा आणि शांतता राखणे सरकारची जबाबदारी आहे- राहुल गांधी (काँग्रेस अध्यक्ष)

alpesh-thakor-in-rally

भाजपकडून क्षत्रिय ठाकोर सेनेवर होणारे आरोप बिनबुडाचे आहेत. माझ्याविरुद्ध हे षड्यंत्र असून, जाणूनबुजून ठाकोर समाजावर गुन्हे दाखल केले जात आहेत- अल्पेश ठाकोर (आमदार)