किम जोंग उन यांचं चित्र फाटले तर याद राखा! उ. कोरिया सरकारचा फतवा

उत्तर कोरियाचा प्रमुख किम जोंग उन. किमच्या कारकीर्दीच्या दशकपुर्तीनिमित्त  एका राष्ट्रीय बैठकीत त्याचे पोर्ट्रेट प्रदर्शित करण्यात आले आहे. उष्णकटिबंधीय वादळ खानुन येत असताना उत्तर कोरियाने किम जोंग-उनच्या पोर्ट्रेटचे संरक्षण करण्याचे आदेश दिले आहेत. सध्या उत्तर कोरिया प्रचंड पाउस, वादळी  वाऱ्याचा सामना करीत आहे. या वादळापासून संरक्षण करण्यासाठी किमच्या चित्राला सर्वोच्च प्राधान्यक्रम देण्यात आला आहे. उत्तर कोरियाच्या नागरिकांना किम राजवंशाच्या पोर्ट्रेटचे संरक्षण करण्यासाठी शक्य ते सर्व काही करण्यास सांगितले गेले आहे. हा देश राजघराण्याची प्रतिमा आणि प्रतीके आत्यंतिक जपणारा आहे. मग या प्रतीष्ठेपुढे सामान्य जनतेला होणारा त्रास, हाल हे सारे दुय्यम ठरते. उष्णकटिबंधीय वादळामुळे दक्षिण कोरियामध्ये आधीच पूर आणि भूस्खलन झाले आहे , ज्यामध्ये एकाचा मृत्यू झाला आहे आणि 16,000 हून अधिक लोकांना सुरक्षित जागी हलविण्यात आले आहे. हे वादळ आता उत्तरेकडे कधीही सरकू  शकते. या नैसर्गिक आपत्तीचा गरीब उत्तरेवर विनाशकारी परिणाम होऊ शकतो, जेथे मुळातच कमकुवत पायाभूत सुविधा आणि जंगलतोड यामुळे पुराची शक्यता वाढली आहे. पण सत्ताधारी कोरियन वर्कर्स पार्टीचे अधिकृत वृत्तपत्र रॉडॉन्ग सिनमुनने म्हटले आहे की, सध्याचे नेते किम जोंग-उन, त्याचे वडील, किम जोंग-इल, यांच्या चित्रांची सुरक्षा करण्यावर जनतेचे प्राधान्याने लक्ष असले पाहिजे, यावर शासनाचा कटाक्ष आहे.

1948 मध्ये उत्तर कोरियाची स्थापना झाल्यापासून उत्तर कोरियावर राज्य करणाऱ्या किम घराण्याच्या मोठ्या संख्येने पुतळे, मोज़ाइक, भित्तीचित्रे आणि इतर स्मारके सुरक्षित ठेवण्याचे आवाहन नागरिकांना केले आहे. “हे पुतळे आणि पोर्ट्रेट केवळ प्रतीके नाहीत तर ती पवित्र धार्मिक प्रतीके आहेत त्यांचे प्राणपणाने रक्षण करणे हे प्रत्येक कोरिअन नागरिकाचे कर्तव्य आहे.