चिदंबरम यांच्या अटकेला १ ऑगस्टपर्यंत मनाई

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना ऑनलाईन । नवी दिल्ली

आयएनएक्स मिडीयाप्रकरणी माजी केंद्रीय अर्थमंत्री पी. चिदंबरम यांना १ ऑगस्टपर्यंत अटक करण्यास दिल्ली उच्च न्यायालयाने मनाई केली आहे. तसेच सक्तवसुली संचालनालयाला (ईडी) तपासात सहकार्य करावे आणि परवानगीशिवाय देश सोडून जाऊ नये असे निर्देशही न्यायालयाने चिदंबरम यांना दिले आहेत.

आयएनएक्स मिडीयाप्रकरणी कार्तीने तत्कालीन केंद्रीय अर्थमंत्री असलेल्या चिंदबरम यांना माहिती दिली होती. तसेच त्यांच्या सहमतीनेच त्याने एफआयपीबीतून परदेशी निधी आणण्यासाठी परवानगी मिळवल्याचा दावा ईडीने केला होता. याकडे लक्ष वेधत चिदंबरम यांच्या अटकेला स्थगिती देण्याच्या मागणीला विरोध केला होता. आयएनएक्स मिडीयाशी संबधीत मनी लॉडरिंगप्रकरणी अंतरिम जामीनासाठी चिंदबरम यांनी २३ जुलै रोजी याचिका दाखल केली होती. एफआयआरमध्ये चिदंबरम यांच्या नावाचा उल्लेख नाही. ईडीकडून त्यांना अटक होण्याची शक्यता आहे, असे याचिकेत नमूद करण्यात आले होते. चिदंबरम यांचे वकील प्रमोदकुमार दुबे आणि अर्शदीप सिंह यांनी ही याचिका दाखल केली होती.