
सामना ऑनलाईन । मुंबई
सध्याच्या युगात प्रत्येक गोष्ट ही ऑनलाईन मिळते मग ते काहीही असो. एका अॅपच्या माध्यमातून चक्क भाडेतत्त्वावर बॉयफ्रेंड मिळणार आहे. होय, तुम्ही खरं वाचताय. ताणतणावापासून काही काळ विश्रांती मिळण्यासाठी १५ ऑगस्ट रोजी सुरू झालेल्या या अॅपच नाव ‘रेंट ए बॉयफ्रेंड टू क्युअर डिप्रेशन’ असं आहे.
‘रेंट ए बॉयफ्रेंड टू क्यूअर डिप्रेशन’ हे अॅप सुरू करण्याचं मुख्य कारण की या अॅपच्या माध्यमातून आपण काही प्रमाणात आपला ताणतणाव दूर करू शकतो. तसेच काही लोक हे आपल्या घरापासून शिक्षणासाठी तसेच नोकरीसाठी दूर राहायला येतात. अशावेळी त्यांना एकटं वाटतं आणि ते लोक नेहमी तणावात असतात, त्यामुळे हे अॅप तयार करण्यात आला आहे. १५ ऑगस्ट रोजी सुरू झालेल्या अॅपच्या माध्यामातून काही काळापुरता का होईना तुमचा तणाव दूर होऊ शकतो.
तुम्हाला सेलिब्रिटी सोबत राहायचे असल्यास तुम्हाला एका तासाला ३ हजार रुपये मोजावे लागतील. तसेच मॉडल असल्यास एका तासाला २ हजार रुपये आणि सामान्य व्यक्ती असल्यास ३०० ते ४०० रुपये असा याचा दर निश्चित करण्यात आला आहे. यासाठी एक टोल फ्री नंबर देखील देण्यात आला आहे. त्याद्वारे तुम्ही तुम्हाला हव्या असलेल्या व्यक्तीशी बोलू शकता. या टोल फ्री नंबर वर १५ ते २० मिनिटे बोलण्यासाठी तुमच्याकडून ५०० रुपये घेतले जातील. परंतू या व्यक्तींना तुम्ही एकांतात कुठे घेऊन जाऊ शकत नाही.




























































