
एखाद्या इन्स्टाग्राम युजर्सला आपल्या आवडीच्या क्रिएटर्सचा कन्टेन्ट बघायचा असेल तर त्यासाठी त्याला सबस्क्रिप्शन घ्यावे लागेल. सर्व क्रिएटर्ससाठी हे लागू नाही. कदाचित लिमिटेड कंपनी, खास कंटेन्टसाठीच असेल.
जगातील लोकप्रिय सोशल मीडिया प्लॅटफॉर्म असलेल्या इन्स्टाग्रामसाठी आता युजर्सला पैसे मोजावे लागणार आहेत. सध्या इन्स्टाग्राम एका नव्या सबस्क्रिप्शन फीचरवर काम करत आहे. त्यामध्ये युजर्सली कंटेट ऍक्सेस करण्यासाठी दर महिन्याला 89 रुपये द्यावे लागतील. यामुळे क्रिएटर्स आणि इन्फ्लूएन्सर्सला फायदा मिळेल, असे कंपनीचे म्हणणे आहे.
टेक क्रंचच्या एका रिपोर्टनुसार, सध्या ऍपल ऍप स्टोअरच्या लिस्टिंगमध्ये इन-ऍप- पर्चेज दिसत आहे. त्यासाठी इन्स्टाग्राम सबस्क्रिप्शन कॅटेगिरीही तयार करण्यात आली आहे. सध्यातरी 89 रुपये दर महिन्याला शुल्क दिसत आहे. जेव्हा हे फीचर प्रत्यक्षात युजर्ससाठी आणले जाईल, तेव्हा त्यामध्ये बदल होऊ शकतो. कंटेट क्रिएटर्सला स्वतःचे सब्सक्रिप्शन शुल्क ठरवण्याचे पर्याय मिळणार असल्याचे समजते.
n युजर्सने 89 रुपयांचे सबस्क्रिप्शन घेतले तर त्याला एक ‘बॅज’ देण्यात येईल. जेव्हा आपण कोणतेही कमेंट किंवा मॅसेज करू तेव्हा प्रत्येक वेळी हा ‘बॅज’ युजरनेमच्या बाजूला दिसेल. त्यामुळे सबस्क्रिप्शन घेणाऱया युजर्सला ओळखणे सोपे
























































