ट्विटर अकाऊंट होणार अधिक सुरक्षित!

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

तुमचे ट्विटर अकाऊंट आता अधिक सुरक्षित होणार आहे. सध्या ट्विटर युजर साईन इन करण्यासाठी फक्त एकच सिक्युरिटी की वापरू शकतात. तसेच दुसरी टू-फॅक्टर ऑथेंटिकेशन पद्धत म्हणून एक ऑथेंटिकेटर अॅप किंवा एसएमएस कोड आवश्यक आहे. पंपनीने ट्विटमध्ये म्हटलंय, अनेक सिक्युरिटी की वापरून तुम्ही तुमचे ट्विटर अकाऊंट सुरक्षित ठेऊ शकता. आता तुम्ही मोबाईल आणि वेब दोन्हीवर एकापेक्षा अधिक सुरक्षा की वापरून लॉग इन करू शकता.

सिक्युरिटी कीज या फिजिकल असतात. ज्या यूएसबी किंवा ब्ल्यूटूथच्या मदतीने कनेक्ट केलेल्या असतात. ऑनलाइन सोशल मीडिया अकाऊंट्सचे संरक्षण करण्यासाठी त्या अधिक सुरक्षित मार्गाने तयार केल्या आहेत.