
गुगल आता एक असे फीचर आणणार आहे, जे आपल्याला सर्च केलेली माहिती मोठय़ा आवाजात ऐकायला मिळणार आहे. तेही पाच वेगवेगळ्या भाषांमध्ये!
नव्या फीचरची घोषणा गुगल फॉर इंडिया इव्हेंटच्या सातव्या कार्यक्रमात करण्यात आली. हा कार्यक्रम ऑनलाइन पार पडला. नव्या ग्लोबल फर्स्ट फीचरमध्ये आपण गुगल असिस्टंटला सर्च रिझल्ट वाचून दाखवण्याची विनंती करू शकणार आहोत. हे फीचर ड्रायव्हिंगच्या वेळीही महत्त्वाचे ठरणार आहे. तसेच अंध लोकांसाठी महत्त्वाचे ठरणार आहे. कोरोना लसीकरणासाठी गुगल कंपनीने स्लॉट बुक करण्याच्या सुविधेचीही घोषणा केली आहे.
टिकटॉकप्रमाणे छोटे व्हिडीओ बनवा
इव्हेंटमध्ये गुगल कंपनीने टिकटॉकसारखे यूटय़ूब शॉर्ट अॅपदेखील लाँच केले आहे. आतापर्यंत हे एक फीचर यूटय़ूबवर दिसायचे. मात्र आता याला वेगळ्या पद्धतीने युजर वापरू शकणार आहेत. इथे युजर्स 60 सेपंदांपर्यंतचे व्हिडीओ शूट करून शेअर करू शकतील.



























































