
आसामनंतर आता हरयाणामध्येही राष्ट्रीय नागरिक नोंदणी (एनआरसी) केली जाणार असल्याची घोषणा हरयाणाचे मुख्यमंत्री मनोहर खट्टर यांनी केली. खट्टर यांनी ‘महासंपर्प यात्रे’दरम्यान पंचकुला येथे निवृत्त न्यायाधीश एच. एस. भल्ला आणि माजी नौदलप्रमुख सुनील लांबा यांची भेट घेतली. त्यानंतर त्यांनी याची घोषणा केली.
हम हरियाणा में राष्ट्रीय नागरिकता रजिस्टर (NRC) को लागू करेंगे।https://t.co/WujI5Heb5E pic.twitter.com/L4ux26f0Qi
— Manohar Lal (@mlkhattar) September 15, 2019
देशभरात एनसीआर लागू करावे, अशी आग्रही मागणी खट्टर यांनी या आधीच केली होती. महासंपर्प यात्रेदरम्यान विविध क्षेत्रांतील मान्यवरांची भेट घेतल्यानंतर त्यांनी हा निर्णय घेतला आहे. ‘एनआरसी’बरोबरच कायदा आयोग आणि बुद्धिजीवींसाठी स्वतंत्र विभाग स्थापन केला जाणार आहे, असेही खट्टर म्हणाले. आसाममध्ये नव्याने एनआरसी नोंदणी केल्यानंतर 31 ऑगस्टला प्रकाशित करण्यात आलेल्या यादीत 19 लाख लोकांना घुसखोर जाहीर करण्यात आले. दरम्यान, हरयाणात सोशल ऑडीट सिस्टीमही लागू करण्यात येईल, असेही मनोहरलाल खट्टर म्हणाले. माजी सैनिक, प्राध्यापक, अभियंता यांच्याकडून विकास कार्यांचे ऑडीट करून घेण्यात येईल. असेही ते म्हणाले.


























































