एनआरसी अहवाल जारी करण्याची मुदत 31 ऑगस्टपर्यंत वाढवली

22

सामना ऑनलाईन, नवी दिल्ली

एनआरसी अर्थात राष्ट्रीय नागरिक नोंदणीचा अंतिम अहवाल जारी करण्यासाठीची अंतिम मुदत 31 ऑगस्टपर्यंत वाढवण्यात आली आहे. आसाम सरकारने याबाबत सर्वोच्च न्यायालयात अपील केले होते. त्यावर न्यायालायने निर्णय दिला आहे. यापूर्वी सरकारला 31 जुलैपर्यंत एनआरसीचा अहवाल जारी करण्याचे निर्देश देण्यात आले होते.

आसाममध्ये निर्माण झालेल्या पूरपरिस्थितीच्या पार्श्वभूमीवर केंद्र आणि आसाम सरकारने एनआरसीचा अंतिम अहवाल जारी करण्यासाठीची मुदत वाढवण्यासाठी सर्वोच्च न्यायालयात अपील केले होते. देशातील घुसखोरांना कुठल्याही परिस्थितीत देशाबाहेर काढण्याची केंद्र सरकारची भूमिका आहे. या प्रकरणी सर्वोच्च न्यायालयाने 31 जुलैपर्यंत सर्वेक्षण करून अंतिम अहवाल तयार करण्यास सांगितले होते. मात्र सरकारने ही तारीख वाढवून देण्यासाठी अपील केले होते. या अपिलावर निर्णय देताना सर्वोच्च न्यायालायने एनआरसीचा अंतिम अहवाल सादर करण्याची मुदत 31 ऑगस्टपर्यंत म्हणजेच एक महिन्याने वाढवली आहे.

आपली प्रतिक्रिया द्या