एन. टी. रामाराव यांच्या धाकट्या मुलीची गळफास घेऊन आत्महत्या

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

तेलुगू देसम पार्टीचे संस्थापक नंदमुरी तारक रामाराव उर्फ एनटीआर यांच्या सर्वात लहान मुलीने गळफास घेऊन आत्महत्या केली आहे. कंथामनेनी उमा माहेश्वरी असं त्यांचं नाव आहे.

कंथामनेनी यांनी हैदराबाद येथील ज्युबली हिल्स येथील घरात आत्महत्या केली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, रविवारी 12 वाजता कंथामनेनी यांच्या कुटुंबातील सदस्यांनी त्यांचा मृतदेह पंख्याला लटकलेला दिसला. दरवाजा आतून बंद केलेला होता.

प्राथमिक तपासानुसार, त्या गेल्या काही काळापासून नैराश्यग्रस्त होत्या. पोलिसांनी या प्रकरणी तक्रार नोंदवली असून त्यांचा मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवला आहे. कंथामनेनी या आंध्र प्रदेशचे माजी मुख्यमंत्री चंद्रबाबू नायडू यांच्या वहिनी देखील होत्या.