समुद्रकिनाऱ्यावर कपडे घालण्यास बंदी घाला! नैसर्गिक अवस्थेत सूर्यस्नान घेण्यासाठी विचित्र मागणी

अनेक युरोपीय देशात समुद्र किनाऱ्यांवर सूर्यस्नानासाठी प्रचंड गर्दी होते. आपल्याकडेही हा ट्रेंड कधीचाच आला आहे. पण प्रखर सूर्यप्रकाशामुळे त्यावर अर्थातच मर्यादा पडतात. पण स्पेनसारख्या युरोपीय देशात मात्र सूर्यस्नानाचा आनंद घेतला जातो. अशाच काही रसिक लोकांनी समुद्रकिनार्यावर कपडे घालण्यास कायदेशीर बंदी घालावी अशी मागणी केली आहे. या मागणीवरून वाद होण्याची चिन्हे आहेत. मात्र, सध्या तरी याची जोरदार चर्चा होत आहे.

कॅटालोनियाच्या निसर्गवादी-न्युडिस्ट फेडरेशनने संबंधित अधिकार्‍यांना पत्र पाठवून समुद्रकिनाऱ्यांवर असा नियम आणण्याबाबत सांगितले आहे. स्पेनमध्ये स्पॅनिश, डच आणि इंग्रजीमध्ये समुद्रकिनाऱ्यावरील न्युडिस्ट झोनसाठी चिन्ह आणावे अशीही मागणी करण्यात आली आहे. जेणेकरून कोणालाही अंगावरील पोहण्याच्या पोशाखाची लाज वाटणार नाही. लोकांनी समुद्रकिनाऱ्यावर कपडे घालणे बंद करावे अशी स्पेनमधील न्युडिस्टांची इच्छा आहे.