ओडिशात उत्खननात सापडले 10व्या शतकातील शिवलिंग

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

ओडिशाची राजधानी भुवनेश्वर येथे लिंगराज मंदिराजवळील उत्खननात प्राचीन मंदिराचे अवशेष सापडले आहेत. त्यात सापडलेले पुरावे 10 व्या शतकातील असल्याचा अंदाज आहे. आर्किओलॉजीकल सर्व्हे ऑफ इंडियाने हे खोदकाम केले आहे.

सध्या लिंगराज मंदिरात एका प्रकल्पांतर्गत उत्खनन आणि सौंदर्यीकरणाचे काम पुरातत्व विभागातर्फे सुरू आहे. खोदकाम सुरू असताना शिवलिंग सापडले असून ज्याच्या तळाला दगडात कलाकृती साकारण्यात आलेल्या आहेत. प्राचीन मंदिराचे जे अवशेष सापडले आहेत, त्यावरून हे सोमवंश काळातील मंदिर असल्याचे समजते. मूर्तींवर सुंदर नक्षीकाम आढळून येते. भिंतींच्या काही भागांमध्ये राजघराण्यातील काही पुतळे आढळून आले आहेत. मूर्तीं भक्कम आणि मजबूत असून त्यांचे नुकसान झालेले नाहीत. मूर्ती संस्कृत महाविद्यालयाच्या परिसरात दफन करण्यात आल्या होत्या. या खोदकामादरम्यान अनेक प्राचीन मंदिर दिसून आल्याचे आर्किओलॉजीकल सर्व्हे ऑफ इंडियाच्या अधिकाऱयांनी सांगितले.