
नवरात्रोत्सवाला आजपासून सुरुवात होणार आहे. सर्वत्र आनंदाचे, उत्साहाचे वातावरण आहे. या उत्सवाचे औचित्य साधून प्रसिद्ध वाळू शिल्पकार सुदर्शन पटनायक यांनी ओडिशाच्या पुरी येथील समुद्रकिनारी देवीचे भव्यदिव्य शिल्प साकारले आहे. हे शिल्प सर्वांचे लक्ष वेधून घेत आहे. सुदर्शन यांनी आपल्या ट्विटर अकाऊंटवर देखील या कलाकृतीचे फोटो शेअर केले आहेत.


























































