पैसे घेऊनही काम न केल्याचा आरोप, मंत्र्यांच्या दालनात घुसून अधिकाऱ्याला चोपला

17

सामना ऑनलाईन, मुंबई

सामाजिक न्यायमंत्री राजकुमार बडोले यांच्या दालनात घुसून तिथल्या अधिकाऱ्याला चोपल्याची घटना गेल्या शुक्रवारी घडली आहे. मंत्रालयाच्या तिसऱ्या मजल्यावर असलेल्या बडोले यांच्या कार्यालयात हा सगळा तमाशा झाला आहे. ज्या व्यक्तीने अधिकाऱ्याला मारहाण केली आहे त्याचं नाव अरुण निटोरे असल्याचं सांगण्यात येत आहे. पैसे घेऊनही या अधिकाऱ्याने काम न केल्याने त्याला चोपल्याचं निटोरेंचा आरोप आहे. यासाठीच निटोरेंनी या अधिकाऱ्याला कानाखाली वाजवल्याचं  सांगण्यात येतंय.

एका मराठी दैनिकाने दिलेल्या वृत्तात म्हटलंय की निटोरे यांची धाराशिवच्या केशेगावमध्ये असलेली माता रमाबाई आंबेडकर आश्रम शाळा अनुदानावर आणण्यासाठी ते प्रयत्नशील होते.  तीन वर्ष ते यासाठी प्रयत्नशील होते. पैसे दिल्यानंतरही या अधिकाऱ्याने मी तुझ्या एका पैशांचाही मिंधा नाही असं सांगितल्याने निटोरे भडकले आणि त्यांनी या अधिकाऱ्याला चोपले. या अधिकाऱ्यावर अद्याप कोणतीही कारवाई करण्यात आली नसल्याचं सांगण्यात येतंय.

आपली प्रतिक्रिया द्या